1. इंटिग्रेटेड कोर्स:
    यु.पी.एस.सीच्या अभ्यासक्रमाच्या चांगल्या कव्हरेजसाठी, मेन्स आणि प्रिलिम्स अभ्यासक्रमाचा
    कॉमन अभ्यासक्रम शोधून इंटिग्रेटेड पद्धतीने अभ्यासक्रमाची आखणी केली जाते.
    उमेदवारांनी जानेवारी महिन्यापर्यंत पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे कोचिंग
    दिले जाते आणि त्याचा सखोल अभ्यास करून घेतला जातो. या टप्प्यात विषयांचे विस्तृत
    वाचन, नोट्स आणि नकाशे (माईंड मॅप्स) तयार करणे आणि त्याबरोबरच तथ्यात्मक माहिती
    चार्ट विकसित करणे इ., समाविष्ट आहे.
    चालू घडामोडींचे वाचन, विश्लेषण आणि वेळेवर उजळणी या काळात आवश्यक आहे.
    फेब्रुवारी ते मे या कालावधीत केवळ प्रिलिम्सवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो. या
    टप्प्यात संकल्पना, तथ्यात्मक माहिती, चालू घडामोडी / सामान्य जागरूकता यावर प्रश्न आणि
    सीएसएटी पेपर सराव समाविष्ट आहे.
    प्रिलिम्स नंतर लगेच उत्तर लेखन सराव सह मेन्स परीक्षेच्या उजळणी प्रारंभ करण्याची करावी.
  2. योग्य शेड्युलची आखणी:
    यु.पी.एस.सीच्या परिपूर्ण अभ्यासाची कोणतीही कॉमन योजना नसते. प्रवाह मध्ये प्रत्येक
    विद्यार्थ्याच्या गती आणि आकलन अनुरूप योग्य योजना बनवून देण्यात येते आणि त्याचा
    सतत फॉलो अप घेण्यात येतो.
  3. विद्यार्थ्यांकडून विस्तृत वाचनानंतर नोट्स, चार्ट्स आणि माईंड मॅप्स:
    सर्वसमावेशक संकल्पना समजून घेण्यासाठी, त्यांचे सर्व बाबींमध्ये (उदा. राजकीय, ऐतिहासिक,
    सांस्कृतिक, भौगोलिक, चालू, शैक्षणिक, शासकीय योजना इ.) विश्लेषण करण्यासाठी सखोल
    प्रथम वाचन ही गुरुकिल्ली आहे.
    प्रवाह मध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे प्रिंटेड नोट्स दिल्या जातात पण त्यांना स्वतःचे नोट्स
    बनवण्याचे टेक्निकसुद्धा शिकवले जाते.

एकदा सखोल वाचन पूर्ण झाल्यावर, अभ्यासलेल्या गोष्टींच्या नोट्स, अधिक चांगले लक्षात
ठेवण्यासाठी चार्ट्स आणि संपूर्ण चॅप्टरचा संघटित सारांश बनवून घेण्यात येतो. तसेच नाव, वर्ष,
उल्लेख, ओळख इ. साठी खास वेगळे चार्ट्स आपण विद्यार्थ्यांकडून बनवून घेतो. सिद्धांत,
संकल्पना, सद्य घटनेची प्रासंगिकता आणि प्रत्येक अध्यायातील विश्लेषणाचे चांगल्या प्रकारे
स्मरण आणि दुवा साधण्यासाठी विध्यार्थ्यांना माईंड मॅप्स बनवून दिले जातात.

  1. चालू घडामोडींसाठी स्पेशल लेकचर्स – प्रिंटेड नोट्स आणि वृत्त पात्र वाचनाची टेक्निक:
    चालू घडामोडी प्रीलिम्स तसेच मेन्स परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण असतात. स्टॅटिक आणि
    डायनॅमिक प्रश्नांव्यतिरिक्त सध्याच्या घडामोडी आणि घटनांशी संबंधित विषयांवर मुख्य परीक्षेत
    प्रश्न पडतात.

प्रवाह मध्ये वेगवेगळ्या स्रोतांकडून नोट्स आणि इंटरनेटमधून संकलित करून दिले जातात आणि
त्यावर स्पेशल लेक्चर्स घेण्यात येतात ज्यामध्ये सर्व बाजूने (उदा. राजकीय, ऐतिहासिक,
सांस्कृतिक, भौगोलिक, चालू, शैक्षणिक, शासकीय योजना इ.) विश्लेषक चर्चा होते आणि मुद्दे
लिहून दिले जातात. रोजचे वृत्तपत्र वाचून त्यातून अभ्यासक्रमानुसार बातम्या संकलित करून
त्याचे नोट्स बनवण्याची टेक्निक मुलांना शिकवण्यात येते ज्यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ वाचेल
आणि फक्त महत्वाच्या बातम्या फिल्टर होतील. संकलित सामग्रीची रेगुलर उजळणी साठी
टेस्ट्स घेण्यात येतात. अभ्यासक्रमानुसार संदर्भाचा वापर दररोजच्या सराव किंवा चाचणी
मालिकेच्या उत्तरांमध्ये वापर करून उत्तरे लिहिण्याचा सराव करून घेतला जातो.

  1. विषयनिहाय निबंध तयार आणि सराव :
    यु.पी.एस.सी मेन्स परीक्षेतील निबंध पेपरमध्ये अ आणि ब असे दोन विभाग असतात (प्रत्येकी
    125 गुण). निबंधाच्या तयारीसाठी विध्यार्थ्यांना नियमित वाचन करायला लावून प्रवाह मध्ये
    त्यांच्याकडून भरपूर सराव करून घेतला जातो. विविध विषयांशी निगडित म्हणी, मुद्दे,
    सरकारच्या योजने इ. विद्यार्थ्यांकडून संकलित करून घेण्यात येतात.
  2. मॉक उत्तर लेखन आणि पेपर सॉलविंग सराव:
    यूपीएससी मेन्स परीक्षा वर्णनात्मक, व्यक्तिपरक आणि विश्लेषक अशी आहे. प्रत्येक प्रश्नासाठी
    150-300 शब्दांची उत्तरे लिहावी लागतात. प्रवाह मध्ये त्यासाठी विशेष तयारी करून घेतली जाते:
    अ) योग्य नोट्स तयार करण्याबरोबर नियमित चाचण्या घेतल्या जातात.
    ब) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून, उत्तरे लिहिण्यासाठी सराव करून घेतला जातो.
    सी) तज्ञांकडून उत्तरे तपासून घेतल्या जातात.
    ड) बिंदूनिहाय, वर्गीकृत उत्तरे लिहिण्याची सवय विकसित करून घेतली जाते.
  3. विविध फील्ड ऍक्टिव्हिटीस:
    विविध फील्ड ऍक्टिव्हिटीस मधून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल माहिती आणि पर्स्पेक्टिव्हस समजून
    घेण्यास मदत होते, त्यामुळे प्रवाह मध्ये त्यांच्याकडून अश्या विविध ऍक्टिव्हिटीस करून घेतल्या
    जातात.
  4. स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आकलनशक्ती वाढविण्यासाठी तंत्रे:
    प्रवाह मध्ये विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आकलनशक्ती वाढविण्याचे विविध
    टेक्निक शिकवले जातात आणि फ्लो चार्ट्स दिले जातात.
  5. मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम:
    मनोरंजनामध्ये वाहवत न जाणे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे हेही आहे कि थोडेफार
    मनोरंजन गरजेचे आहे, प्रवाह मध्ये आम्ही मुलांना याचे योग्य प्लॅनिन्ग शिकवले जाते. मानसिक
    हेल्थ आणि अभ्यास सुरळीत राहण्यासाठी शारीरिक व्यायाम अतिशय आवश्यक आहे. मुलांना
    आवश्यक ते सर्व व्यायाम शिकवले जातात आणि त्यांना त्याचे शेड्युल बनवून दिले जाते.
  6. एक्स्पर्ट शिक्षक:
    प्रवाहचे शिक्षक हे स्वतः यु.पी.एस.सी च्या प्रोसेस मधून गेलेले असतात आणि त्यांना
    शिकवण्याचा उत्तम अनुभव असतो. त्यामुळे प्रवाह मध्ये विद्यार्थ्यांना यु.पी.एस.सी च्या पॅटर्न
    प्रमाणेच शिकवले जाते ज्याने परीक्षा क्लिअर करण्याची शक्यता वाढते.

अधिक माहितीसाठी आणि कॉउंसेलिंग संपर्क करा,

सहना वैद्य ८९२८४५८४७९ (संस्थापक-शिक्षक :प्रवाह इन्स्टिटयूट).

Add Comment

You cannot copy content of this page