आपल्या लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची
निवड करण्यासाठी यूपीएससी परीक्षा घेतली जाते. ह्या परीक्षांमधून निवडून अधिकारी झालेल्यांना
सर्वात महत्वाची पदे दिली जातात. अगदी सरकारचे धोरण (policies) तयार करण्यापासून त्या
अंमलात आणण्यापर्यंत ची जवाबदारी ह्या अधिकाऱ्यांवर असते. यूपीएससी परीक्षा परीक्षार्थींमधून
आवश्यकतेनुसार सर्वोत्तम कॅन्डिडेट्स फिल्टर करून निवडतात. लॉटमधील सर्वोत्कृष्ट
निवडण्यासाठी परीक्षेची प्रक्रिया आणि पध्दती अत्यंत हुशारीने तयार केली गेली आहे.

परीक्षेचा पॅटर्न आणि ट्रेंड खूपच डायनॅमिक आणि सतत बदलणारा आहे. ज्यामुळे इच्छुक तसेच
कोचिंग संस्थांना परिपूर्ण रणनीती तयार करणे थोडे कठीण केले आहे. इच्छुक व्यक्तीसाठी
वैचारिक, विश्लेषणात्मक आणि सद्य घटना संबंधित बाबी अशा तज्ञांनी शिकवलेल्या काही
चांगल्या विश्लेषणाबरोबरच स्वतःची मोठ्या प्रमाणात तयारी देखील आवश्यक आहे.

विविध कोचिंग संस्थांमधून मधून करण्यात येणाऱ्या मार्गदर्शना मध्ये ह्या मूळ समस्या आहेत:

  1. विद्यार्थ्यांनी कसा विचार करायचा त्याऐवजी काय विचार करायचा हे शिकवतात.
    आपल्याला एक लक्षात घेतले पाहिजे कि जसा सर्वांना एकाच आकाराचा शर्ट बसेलच असं
    नाही, तसेच प्रत्येकास त्यांच्या योग्यतेनुसार आणि आकलन क्षमतेनुसार टेलर-मेड

सोल्यूशन्सची आवश्यकता असते आणि ते इथे शक्य होत नाही. अश्याने विद्यार्थ्यांची
सृजनात्मक शक्ती कमी होते.

  1. इच्छुकांना आकर्षित करण्यासाठी संस्था भरपूर पैसा खर्च करतात आणि असे करण्याच्या
    प्रयत्नात काही वेळा ते अभ्यासक्रमांच्या गुणवत्तेचा मूलभूत भाग गमावतात. 90% कोचिंग
    संस्था थेट एनसीईआरटीएस मधून शिकवत नाहीत जे परीक्षेचा पाया आहेत. किंवा
    विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम नीट समजून घेऊन लक्षात ठेवायला सांगत नाहीत जे खूप
    आवश्यक असते तरच करंट घटनांशी संबंध जोडून यूपीएससी परीक्षेची योग्य ती तयारी
    करते येते.
  2. अजून एक मोठी समस्या ही आहे की विद्यार्थ्यांकडून प्रश्न पत्रिका सोडवून घेऊन त्याचे
    विश्लेषण करून दिले जात नाही आणि चुका झाल्यास योग्य त्या दुरुस्त्या करून दिल्या
    नाहीत. शिवाय सर्प्राइस चाचण्यांद्वारे वारंवार त्यांच्या तयारीची टेस्ट होत नाही.
  3. विद्यार्थ्यांना सोपे पडावे म्हणून, ते प्रत्येक गोष्टीच्या रेडीमेड नोट्स देतात. पण अशा
    प्रकारे विद्यार्थ्यांची स्वतःची उत्तरे शोधून स्वतःचा दृष्टीकोन विकसित करण्याची सर्वात
    महत्वाची प्रोसेस विकसित होत नाही.
  4. बर्‍याच कोचिंग संस्था फायद्याचे उद्दीष्ट ठेवून प्रत्येक वर्गात 50 हून अधिक विद्यार्थी
    घेतात तर काहीजण 100 पार करतात. सर्वांना एकाच मापात पकडून एकाच प्रतीचा
    आहार समान प्रमाणात दिला जातो ज्यामुळे पर्सनल अटेंशन मिळणे कठीण होऊन बसते!
  5. याउप्पर, दुर्मीळ असलेल्या चांगल्या कोचिंग संस्था मोठ्या शहरांमध्ये आहेत आणि
    म्हणूनच त्यामध्ये प्रवेश घेऊन तयारीसाठी शहरात राहणे हे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसते.

अधिक नफा मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रीमियम संस्था अद्याप ग्रामीण
भागामध्ये कमी फी मिळत असल्याने त्यामध्ये अद्याप पोचल्या नाहीत, त्यामुळे बर्‍याच
हुशार व तेजस्वी विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन मिळत नाही.

  1. यूपीएससी अभ्यासक्रमाचे दोन प्रकारच्या नोट्स असतात: स्टॅटिक आणि डायनॅमिक.
    स्टॅटिकमध्ये एनसीईआरटी पुस्तके, संदर्भ पुस्तके इत्यादींचा समावेश असतो. डायनॅमिक
    अभ्यासक्रमात चालू घडामोडी आणि प्रत्येक घटनेचे विश्लेषण आणि त्यातील परिणाम
    समाविष्ट असतात. कोणतीही संस्था आपल्याला सर्व संबंधित नोट्स देऊ शकत नाहीत.

वरील मुद्दे लक्षात घेता विद्यार्थ्यांनी योग्य मेंटॉर किंवा कोचिंग संस्था शोधणे खूप आवश्यक
आहे. मार्केटिंग च्या भूल थापांना बळी न पडता योग्य शहानिशा करूनच क्लास निवडावा.

ह्या लेखमालेतील पुढच्या लेखात आपण पाहणार आहोत “विद्यार्थ्यांना तयारी करताना येणाऱ्या
अडचणी आणि त्यावरचे उपाय”.
अधिक माहितीसाठी आणि कॉउंसेलिंग संपर्क करा,

सहना वैद्य ८९२८४५८४७९ (संस्थापक-शिक्षक :प्रवाह इन्स्टिटयूट).

Add Comment

You cannot copy content of this page