यु.पी.एस.सी मेन्स परीक्षेतील निबंध पेपरमध्ये अ आणि ब असे दोन विभाग आहेत ज्यात
प्रत्येकी १२५ गुण आणि एकूण २५० (१२५ × २) गुण आहेत.
सामान्यत: एका विभागात ‘तत्वज्ञान, समाज, प्रसिद्ध म्हणी आणि अॅबस्ट्रॅक्’ विषयांवर
आधारित विषय असतात तर दुसर्या विभागातील विषय ‘प्रशासनाशी संबंधित’ असतात.
उमेदवारांना प्रत्येक विभागातून एखादा विषय निवडावा आणि तीन तासांच्या मुदतीत एक हजार
ते दोन हजार शब्दांमध्ये विषयावर लिहावे लागेल.
निबंध पेपरसाठी चांगली रणनीतीचे तीन भाग आहेत.
भाग 1: तयारीच्या दिवसांत योग्य स्त्रोतांमधून वाचन आणि घटक:
वेगवेगळ्या दृष्टीकोनातून एखादा मुद्दा समजून घेऊन कल्पना कश्या मांडाव्यात यासाठी प्रख्यात
लोकांचे निबंध वाचा.
निबंध लिहिताना खालील घटक आवश्यक आहेत:
म्हणी: विषयानुसार म्हणींची यादी तयार करा. उदा. पारदर्शकता, स्वातंत्र्य, माध्यम, ई-
गव्हर्नन्स इ. विषयाशी संबंधित म्हणी निबंधात समाविष्ट करा कारण त्यामुळे
विषयासंबंधीचा तुमचा दृष्टीकोन स्पष्ट करते. मागील वर्षाच्या निबंधांच्या पेपरमधून
आपल्याला विषय सापडतील.
कथाः विषयानुसार एखादी कथा समाविष्ट करा कारण एक कथा निबंधाच्या विषयाशी
चांगली ओळख होण्यास आणि एक अनालॉजि देण्यास ते मदत करते.
रचना: शक्य तितके पैलू कव्हर करा. विषयांचे विस्तृतपणे विश्लेषण (ऐतिहासिक,
सामाजिक, भौगोलिक, राजनैतिक, शैक्षणिक इ.) करा. नेहमीच साधक आणि बाधक
म्हणजेच, समान समस्येच्या दोन्ही बाजूंचा समावेश करा आणि नंतर त्याबद्दल आपले
समर्थन योग्य औचित्यासह द्या.
समाप्तीः नेमक्या शब्दात, लहान आणि आशावादी असा निष्कर्ष लिहा.
सरकारी उपक्रम: योजना, धोरण, जागतिक निर्देशांक, मिशन आणि सरकारच्या
कार्यक्रमांचा संदर्भ विविध क्षेत्रात समाविष्ट करा.
भाग 2: सराव
कोणत्याही कोचिंग संस्थेची निबंध चाचणी मालिकेत नाव नोंदवा
नियमितपणे निबंध लिहा आणि सहकारी इच्छुक किंवा प्रशिक्षकांकडून अभिप्राय मिळवा.
उमेदवार नसलेल्या मित्रांना पण आपले निबंध दाखवायला लाजू नका. कधीकधी
आपल्याला त्यांच्याकडून काही अनोखा अभिप्राय मिळेल. प्रत्येकाचा दृष्टीकोन महत्त्वाचा
असतो ज्याने कोणत्याही विषयाचे उत्तम आयोजन करता येते.
यू.पी.एस.सी.च्या मागील 7 वर्षांच्या निबंधांचा सराव करून पहा. विषयांच्या थिम्स ची
पुनरावृत्ती होतेच.
सभ्यता, अर्थव्यवस्था, शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण, तत्वज्ञान, समाजशास्त्रीय,
विज्ञान इत्यादी विषयांच्या विविध प्रकारांचा सराव करा.
पोलिस सुधारणेची १० वर्षे, सिनेमाची १०० वर्षे, पाण्याचे वाद इत्यादीसारख्या प्रत्येक
वर्षाच्या सद्य संबंधित विषयाचा सराव करा. संबंधित बातम्या ज्या बातम्यांमधल्या
आहेत त्या विषयावरील विषय कथित करा.
भाग 3: परीक्षेचा दिवस
विषयाची निवड: आपल्या सामर्थ्यावर प्रतिबिंबित करणारा विषय निवडा. उत्तम निबंधाची
हि गुरुकिल्ली आहे.
विचार करून आणि सांगाडा बनवणे: विविध बाबींसाठी १० ते २० मिनिटांचा सखोल विचार
करा आणि त्यांना संरचनेत एकत्र जोडा. एक बेसिक सांगाडा आणि पॉईंटर्स बनवा. निबंध
लिहिण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे याची खात्री करा.
विषयावर आणि त्याच्या परिप्रेक्ष्यावर लक्ष केंद्रित करणे: आपल्याला जे माहित आहे ते
लिहू नका, काय विचारले आहे ते लिहा. आपण चांगली तयारी केली आहे आणि सराव
केल्यामुळे याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टी लिहाव्या. विषयाशी चिकटून आहात हे
सुनिश्चित करण्यासाठी लिहिलेल्या प्रत्येक पृष्ठानंतर निबंधाचा विषय वाचा.
सर्वसाधारण दृष्टीकोन: आपल्या निबंधाने परीक्षकांना अपील व्हावे असे लिहा. यात सर्व
बाजू असणे आवश्यक आहे परंतु विश्लेषणाचे असे असावे जेणेकरुन ते लांब जीएस
उत्तरासारखे दिसणार नाही. उधारण, कथा, उदाहरणे यात मदत करतात. आपण फ्लोचार्ट,
आकृती इत्यादी जोडू शकता.
वेळेवर समाप्त करणे: आपल्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करा आणि निबंध अर्धा किंवा
शेवट न करता सोडू नका याची खात्री करा.
अधिक माहितीसाठी आणि कॉउंसेलिंगकरिता संपर्क करा,
सहना वैद्य ८९२८४५८४७९ (संस्थापक-शिक्षक : प्रवाह इन्स्टिटयूट आणि मुंबई युनिव्हर्सिटी प्रशिक्षक).
Add Comment