“स्वप्न आणि सत्य यामध्ये केवळ प्रयत्नांचे अंतर असते. “
१२ वी संपवून ग्रॅड्युएशन ला ऍडमिशन घेतली कि मनात असंख्य स्वप्नं असतात. काय करावे, कोणते करिअर
निवडावे, भविष्यात नेमके काय करायचे आहे इ. प्रश्न पण पडतात. प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा
आणि त्याबरोबरच योग्य मार्गदर्शन लागते. असेच एक उदात्त स्वप्न म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत निवड.
ज्यांना आयुष्यात देशासाठी, समाजासाठी काही करायचे आहे, सद्य परिस्थितीत बदल घडवून आणायचा आहे
त्यांच्या साठी भारतीय प्रशासकीय सेवा हा उत्तम पर्याय आहे.
आयएएस (Indian Administrative Services/ आयपीएस (Indian Police Services) का व्हावे
ह्यावर आपण थोडी चर्चा करूया.
- आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्या तरी जॉब सेक्युरिटीचा प्रश्न खूप
अवघड आहे, अश्या वेळेला प्रशासकीय सेवेत मिळणारी जॉब सेक्युरिटी अत्यंत आकर्षक आणि उपयुक्त ठरते.
खुद्द भारताचे राष्ट्रपतीं निवड झालेल्यांना अपॉइंटमेंट लेटर देतात आणि त्यांच्या व्यतिरिक्त एका
अधिकारीला कोणीही त्याच्या पदावरून काढू शकत नाही. - प्रशासकीय सेवेत मिळणारी कायदेशीर पॉवर समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी अतिशय उपयुक्त
ठरते. संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करण्याची ताकत आणि क्षमता ह्या अधिकाऱ्यांना प्राप्त असते. शिक्षण
क्षेत्रापासून ते जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेपर्यंतच्या गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी आवश्यक
धोरण बनवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे अधिकाऱ्यांच्या हातात असते. - अवाढव्य अधिकारांव्यतिरिक्त प्रशासकीय सेवेतील अधिकारयांना संविधानाचे विशेष संरक्षण प्राप्त असते.
- प्रशासकीय सेवेत स्टेटस व पगार पण उत्तम असतो. समाजात मान मिळतो, परिवाराला लागणाऱ्या सर्व सोयी
ह्या उत्कृष्ट प्रतीच्या असतात. समाजामध्ये एक जवाबदार हुद्द्याची व्यक्ती म्हणून ओळख राहते आणि
चांगले काम केल्यास लोक सदैव चांगला प्रचार करतात. - आपण कर्तव्यदक्षपणे काम केल्यास आपल्या भावी पिढीसाठी एक उत्तम देश उभा करू शकतो आणि आपली
भावी पिढीपण आपल्याला एक उत्तम रोल मॉडेल च्या रूपात पाहते आणि अश्या असंख्य तरुणांसाठी आपण एक
प्रभावशाली मार्गदर्शक ठरू शकतो. - समाज मानसामध्ये सर्वोच्च पदावर विराजमान असेलेल्या व्यक्तींशी व विविध क्षेत्रामधील तज्ज्ञांशी
आपल्या नियमित भेटी होतात व खूप काही शिकण्याची मिळते. - प्रतिनियुक्तीवर (डेप्युटेशन), आयएएस अधिकारी केंद्रात विविध विभागाचे मुख्य म्हणून नियुक्त
केले जातात, तर आयपीएस अधिकारी विविध क्षमतांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (सीएपीएफ)
सामील होतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आयएएस अधिकारी संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक बँक गट, जागतिक व्यापार
संघटना इत्यादी जागतिक आंतर सरकारी संस्थांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतात तर आयपीएस
अधिकारी संशोधन व विश्लेषण विभाग (आरएडब्ल्यू) च्या युनिट्समध्ये परदेशात तैनात असतात. - सरकार तसेच समाजात सन्माननीय स्थान असल्यामुळे, अधिकारयांना स्वयंसेवी संस्था, इत्यादींद्वारे
क्रीडा, संगीत, अध्यापन, समाजसेवा अशा त्यांच्या आवडीच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी
मिळते. समाजातील महत्त्वाच्या क्लब, संघटना आणि संघटनांचे सदस्य म्हणून बर्याच वेळा त्यांची
निवड केली जाते.
एकंदरीतच स्टेटस, पॉवर, जवाबदाऱ्या, सेक्युरिटी, आवडी-निवडी, अश्या सर्वार्थाने परिपूर्ण असे आयुष्य
आपल्याला जगायला मिळते
आपल्या ह्या लेखमालेच्या पुढच्या लेखांमधून आयएएस/ आयपीएस बनण्यासाठी काय करावे लागते, तयारी
कधी व कशी सुरु करायची, तयारी करताना काय अडचणी येतात व त्यांच्यावरील उपाय, परीक्षेतील विविध
विषयांचा सखोल ट्रेंड एनालीसिस, अभ्यासासाठी उपयुक्त टेकनिक्स ह्या गोष्टींबॉरोबरच विविध विषयांवरचे
सखोल लेख आपण पाहणार आहोत.
अधिक माहितीसाठी व कॉउंसेलिंग साठी संपर्क करा- सहना वैद्य (संस्थापक व शिक्षक- प्रवाह इन्स्टिटयूट ऑफ
कॉम्पेटिटिव्ह एक्सामिनॅशन्स) 8928458479
Add Comment